Monday, May 25, 2020

Convesrations with Kids

मुलं देवाघरची फुले.

हे आपण मुले होतो तोपर्यंत ठीक वाटत होते.
आजकाल मुले देव आणि राक्षस योनी पूर्ण भ्रमण करून भरपूर काही अनुभव ( आई बापाला ) द्यायला पृथ्वीवर येतात.

" तूं माझी आई कशाला झाली, तुझ्यापेक्षा आजी जास्त चांगले जेवण बनवते."
मी " बर , तिला सांग माझ्या आईसाठीपण बनवत जा"

"पण मग तू मला काम आणि अभ्यास करायला का सांगते. आजी कधी नाही सांगत."

हम्म्म.. त्यामुळेच तुझ्या पप्पांचे असे हाल आहेत, आणि माझेही.

" पण तू कशाला काम करते ऑफिस ला जाऊन. आजी तर कधी नाही जात तरी तिच्याकडे जास्त पैसे असता. मी खाऊ मागितला तर लगेच मला पर्स घेऊन यायला सांगते."

आजीचे पप्पा, नवरोबा आणि पोरे सगळे पैसे कमावून आजीला देतात. म्हणून आजीकडे जास्त पैसे असतात. मी माझ्या पप्पा , नवरोबा कडून पैसे घेत नाही आणि तू अजून कमवत नाही.

" आजी ना कॉलेज का गेली ना कामाला. आणि तू, काही कामाची ना धामाची. साधी पोळी लाटता येत नाही, त्याला पण बाई पाहिजे"

शहाणी बाळ असे बोलता का आईला.

"आता तूच म्हणते ना, बिनधास्त खरे काय तेच बोलायचे. कोणी का असेना. देवबाप्पा समोर आला तरी. आता तू पण तर देवबाप्पा च आहे ना."

जा. आजीकडे जा आणि तिचे डोके खा.

"नाही, तिला डोके नाही"

ते कसे
"कारण ती( छाती वर हात ठोकून) इथून विचार करते."

बर. आता मला काम आहे.
तुझ्या चेहऱ्याने सिद्ध होते कोणाचे पोर आहे ते. व्यवहाराने सिद्ध करून नको. पळ इथून.

हा माझा प्रत्येक संभाषणात Concluding Dialogue.